Services

“मावळा” गीताद्वारे इंडियाआशा फौंडेशनचा 'हर घर तिरंगा' अभियानात सहभाग

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत 'हर घर तिरंगा' अभियान राबविण्यात येत आहे. इंडियाआशा फौंडेशनतर्फे या अभियानात वेगळ्याप्रकारे सहभागी होण्यासाठी " मी एक निनावी मावळा " हे एक देशभक्तीपर गीत तयार करण्यात आले आहे दि.१३ ऑगस्ट रोजी हे गीत प्रसारित होत आहे. हर घर तिरंगा अभियानांतर्गत प्रत्येक भारतीयाने आपले कुटुंबीय, नातेवाईक व परिचित यांच्यापर्यंत मावळा गीत पोहचवावे. इंडियाआशा फौंडेशनचे संस्थापक श्री. संजीव दहिवदकर यांच्या या गीताला गायिका हिमांगी विश्वरूप यांनी स्वरसाज देऊन आपल्या मधुर आवाजात गायले आहे. संगीत संयोजन श्री. समाधान वर्तक यांनी केले आहे तसेच निता दुसाने यांनी या प्रकल्पात सहाय्य केले आहे. केवळ १५ ऑगस्ट व २६ जानेवारीच नव्हे तर रोजच देशसेवा व देशाभिमान प्रत्येक भारतीयाच्या नसानसात जागृत करण्यासाठी जास्तीतजास्त लोकांपर्यंत हे गीत पोहचले पाहिजे.

प्रेरणादायी मावळा

देशसेवेचा वसा स्वीकारून निष्ठेने भारतीय जवान आपल्या प्राणांची पर्वा न करता अहोरात्र कष्ट करतात. थंडी, ऊन, पाऊस व इतर अनेक अडचणींचा सामना करत रात्रंदिन शत्रुशी दोन हात करत असतात. आपलं कुटुंब, गाव असा संकुचित विचार न करता मातृभूमीची सेवा करत भारताचे स्वातंत्र्य, सुरक्षा व स्थैर्य अबाधित राखण्यासाठी झटत असतात. दरवर्षी स्थल, वायू व नौसेनेत भरती होण्यासाठी लाखो तरुण प्रेरित होतात. मातृभूमीच्या रक्षणाचे बाळकडू त्यांना आपल्या कुटुंबियांकडून, गावातील लोकांकडून व मातीतूनच मिळते. प्रत्येक भारतीयांसाठी आदर्श व जीवनातले खरे ' हिरो ' घडवण्यात अनेकांचे हातभार लागतात. देशाच्या कानाकोपऱ्यातील गावातून आलेले हे अनोळखी हिरो' सैन्यात भरती होतात . भारतमातेला असे अनोळखी, न पाहिलेले हिरो दिल्याबद्दल प्रत्येक गावकऱ्यांच्या उपकाराची जाणीव ठेऊन त्यांच्याप्रती आदरपूर्वक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी इंडियाआशा फौंडेशनतर्फे देशभक्तीपर गीत तयार केले आहे " मी एक निनावी मावळा ". सीमेवर लढणारे जावन तर महान आहेतच परंतु आरोग्य, शेती , क्रीडा ,कला , साहित्य , संशोदन , उदयोग अशा इतरही क्षेत्रात निष्ठेने काम करून अनेक लोकांनी भारताचे नाव जगात उज्वल केले आहे .प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा, देशसेवेसाठी प्रेरणा मिळावी व देशाची प्रतिमा जगभरात साकारात्कमरित्या उंचावण्याचे काम " मी एक निनावी मावळा " या गीतातून होणार आहे .

गायिका/संगीतकार हिमांगी विश्वरूप यांचा थोडक्यात परिचय –

उत्कटतेने भावनाप्रधान गाणी गाणारी गायिका व संगीतकार हिमांगी विश्वरूप यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे शिक्षण लहानपणापासून आपल्या मातोश्री ऋचा विश्वरूप यांच्याकडे घेतले. 2014 सालापासून शास्त्रीय संगीताचे धडे शंकर महादेवन अकादमी मध्ये घेतले व तेथेच संगीत शिक्षिका म्हणून २०१८ साला पर्यंत त्या कार्यरत होत्या. मूलतः आयटी इंजिनीअर असलेल्या हिमांगी यांनी संगीताची आवड असल्याने आपली जास्त पगाराची नोकरी सोडून संगीत आराधनेसाठी स्वतःला वाहून घेतले. मराठीतील ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक श्री. अशोक पत्की यांच्याकडेही त्यांनी शिक्षण घेतले व त्यांची सहकारी म्हणून काम केले. टी सिरीज अंतर्गत श्री संजय विद्यार्थी यांच्याकडे प्रशिक्षण घेतले. शंकर महादेवन अकादमीतर्फे त्यांनी संगीत दिलेल्या गझलचे प्रसारण श्री. शंकर महादेवन व उस्ताद झाकीर हुसेन यांच्या उपस्थितीत झाले. सध्या सुप्रसिद्ध गझल गायक तलत अझीझ यांच्याकडे त्या प्रशिक्षण घेत आहेत. लहानपणापासून अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील कार्यक्रमात त्यांनी सहभाग दिला आहे. यात झी वाहिनीवरील अंताक्षरी , स्टार प्लस वाहिनीवरील क्या मस्ती क्या धूम, अँड टीव्ही वाहिनीवरील किलर कराओके इत्यादी कार्यक्रमाचा समावेश आहे. संगीत विषयाव्यतिरिक्त त्यांना नृत्याचीही आवड आहे. सध्या त्या शामक डावर नृत्य कंपनीमध्ये नृत्याचे शिक्षण घेत असून विविध कार्यक्रमात त्यांनी सादरीकरणही केले आहे.

गीतकार/ निर्माता श्री संजीव दहिवदकर यांचा थोडक्यात परिचय

सध्या अमेरिकेत वास्तव असलेले श्री संजीव दहिवदकर मूळचे धुळे येथील आहेत. आयटी कंसल्टंट असलेले दहिवदकर आयटी शास्त्र इंडिया या कंपनीचे तसेच इंडियाआशा फौंडेशन या सामाजिक संस्थेचे संस्थापक आहेत. लेखनाची आवड असलेल्या दहिवदकर यांनी कोहम धाबा तसेच रनिंग बिझिनेस घाटी वे हि पुस्तके लिहिली आहेत. टाइम्स वृत्तसमूहाच्या वर्तमानपत्रातून अर्थविषयक लेख तसेच विविध मासिकातून पर्यटन विषयक लेख लिहिले आहेत. भारतीय कला, साहित्य, संस्कृती यांचा अभ्यास व आवडही श्री. दहिवदकर याना आहे. "मी एक निनावी मावळा" या देशभक्तीपर गीतातून त्यांनी मातृभूमीच्या रक्षणासाठी लढणाऱ्या वीरांबद्दल तसेच देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या व्यक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

मुक्त व्यासपीठ - कृतज्ञता अभिव्यक्तीसाठी

मी एक निनावी मावळा या गीतातून व त्याच्या गीतकाराकडून प्रेरणा घेऊन बऱ्याच भारतीय नागरिकांना देखील आपल्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटेल आणि हर घर तिरंगा अभियानात सहभागी व्हावेसे वाटेल . अशा कलाकारांसाठी इंडियाआशा फौंडेशनतर्फे सर्वांसाठी खुले असे मुक्त व्यासपीठ देण्यात आले. या आवाहनास प्रतिसाद देत नागरिकांनी आपल्या स्वरचित कृतज्ञतापर कविता पाठवल्या.

इंडियाआशा फौंडेशन

maintenance-img

Site will be down for maintenance work.

Scheduled on
Saturday 29 Jan 2022 09:00 PM to Sunday 30 Jan 2022 3:00 AM.